
WHY DID NEPAL REFUSE AID FROM OTHER COUNTRIES?
नेपाळमध्ये निसर्गाचा महाभयंकर प्रकोप: परदेशी रेस्क्यू टीम्सना नो एन्ट्री का?
नेपाळमध्ये सध्या निसर्गाचा महाभयंकर प्रकोप सुरू आहे. पूर आणि भूस्खलनामुळे तिथले जनजीवन अक्षरशः नष्ट करून टाकले आहे. अशावेळी भारतासह जगभरातून मदतीचे अनेक हात पुढे आले. पण इथेच एक धक्कादायक गोष्ट घडली. नेपाळने चक्क एक मोठा निर्णय घेत सर्व परदेशी रेस्क्यू टीम्स ना नो एन्ट्री सांगितलेली आहे.
नेपाळला खरेच मदत नकोय का? का या मागे काही मोठी रणनीती आहे !
नेपाळमध्ये पूर येण्यामागची मुख्य पर्यावरणीय कारणे
नेपाळमध्ये आलेला पूर फक्त अतिवृष्टीमुळे आलेला नाही. यामागे खूप मोठी पर्यावरणीय कारणे आहेत.
१. हिमालयाची नाजूक भौगोलिक रचना
नेपाळचा उतार एवढा तीव्र आहे की पाऊस पडल्यावर ते पाणी साचत नाही. ते गुरुत्वाकर्षणा ने हजारो टन माती आणि खडक घेऊन खाली कोसळते.
२. हवामानाचा बदल आणि Glacial Lake Outburst Flood ( GLOF )
GLOF- जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग मुळे हिमालयातील हिमनद्या वितळतात तेव्हा डोंगराच्या वरच्या भागात पाण्याचे तलाव तयार होतात. पाण्याचा दाब वाढल्यामुळे हे तलाव अचानक फुटतात आणि लाखो लि. पाणी खाली वेगाने येते या घटनेला ’GLOF’ असे म्हणतात.
मानवी हस्तक्षेप आणि भीषण परिस्थिती
नेपाळमध्ये असे खूप तलाव फुटण्याच्या पातळीवर आहेत. या नैसर्गिक समस्यांमध्ये भर घातलीय ती म्हणजे मानवी हस्तक्षेपाने. नेपाळमध्ये सुरू असलेला अनियोजित डोंगर खोदून रस्ते बनवल्यामुळे जंगलतोड झाली. आणि डोंगर आतून ढिसूळ ही झालीयेत. त्यामुळे हे संकट आता रौद्र रूप धारण करतेय.
सध्या या प्रकोपामुळे ४५०+ अधिक लोकांचा बळी गेलाय. आणि शेकडो लोक बेपत्ता आहेत.
परदेशी रेस्क्यू टीम्सना नकार का दिला?
परिस्थिती एवढी गंभीर असताना भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान यासारख्या देशांनी आपापल्या रेस्क्यू टीम्स आणि एअरक्राफ्ट्स रेडी ठेवलेत. तर काठमांडू प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्हाला तुमच्या बचाव पथकांची अजिबात गरज नाहीये. आमची स्वतःची लष्करी आणि पोलीस ही परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत.
२०१५ च्या भूकंपाचा कडू अनुभव
यामागे नेपाळला २०१५ चा अनुभव असल्यामुळे नेपाळने या मदतीस नकार दिला. २०१५ मध्ये भूकंप झाल्यामुळे इतर देशाची मदत स्वीकारली होती तेव्हा भाषा आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी होती. आणि नकळत सर्व रेस्क्यू टीम्स मध्ये स्पर्धा चालू झाल्या त्यामुळे बचाव कार्यामध्ये फायदा होण्याऐवजी अडथळे जास्त निर्माण झाले. तो कटू अनुभव गाठीशी असल्यामुळे नेपाळने हा निर्णय घेतला.
नेपाळने परदेशी सैन्याला आणि रेस्क्यू टीम्स ना नकार दिला आहे मदतीस नाही. त्यांना आर्थिक आणि मानवतेची मदत खुल्या मनाने स्वीकार आहे.
३४ देशांचे नागरिक अडकले: नेपाळपुढील मोठे आव्हान
नेपाळ तिबेट सीमेवर दोन नद्यांच्या संगमावर पुरामुळे तयार झालेला एक मोठा तलाव फुटलेला आहे त्यामुळे पाण्याची पातळी अचानक वेगाने वाढली. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणजे ३४ वेगवेगळ्या देशाचे नागरिक तिथे अडकले आहेत. या सर्वांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे असे खूप मोठे आव्हान सध्या नेपाळच्या सैन्यावर आलेली आहे.
